लाहोर - पाकिस्तानचा लेगस्पिनर दानिश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आजीवन बंदी उठवून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) निर्णयानुसार कनेरियावर क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती. तो स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
दानिश कनेरियाला पुन्हा खेळायचंय क्रिकेट, पीसीबीला लिहिले पत्र
कनेरियाने ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्राद्वारे त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटचे (एसीयू) अध्यक्ष यांना, देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास मान्यता देण्यास सांगितले आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांना पत्र पाठवताना कनेरियाने पोस्टमध्ये म्हटले, "मी पीसीबीला कायदेशीर पथकामार्फत आजीवन बंदी हटवण्याचे आवाहन केले आहे. आयसीसीच्या नियमांतर्गत मी पीसीबीला अपील केले आहे की, त्यांनी मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी द्यावी."

वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारे समस्या भेडसावत असून उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला असल्याचेही कनेरियाने पत्रात म्हटले आहे. दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून त्याचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने 61 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत 261 तर एकदिवसीय सामन्यांत 15 बळी घेतले.