मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधीच शिल्लक राहिला आहे. या हंगामाची तयारी पंजाब किंग्ज संघाने जोरात सुरू केली आहे. पंजाबने ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेमिन राइट यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.
पंजाब किंग्ज संघाने राइट यांचे स्वागत ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. राइट यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशाच्या संघाना प्रशिक्षण दिलं आहे. ४५ वर्षीय राइट दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज चार्ल्स लॅगवेल्ट यांची जागा घेतील.
राइट यांच्या समावेशामुळे पंजाब संघाची प्रशिक्षकांची फळी तगडी झाली आहे. अनिल कुंबळे पंजाब संघाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय अॅन्डी फ्लावर, जॉन्टी रोड्स, वसीम जाफर हे देखील प्रशिक्षकांच्या टीममध्ये आहेत.