रोनाल्डोच्या हॅट्रिकच्या जोरावर युव्हेंटसची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Juventu
युव्हेंट्सने अॅटलेटिको माद्रिदवर ३-० ने मिळवला शानदार विजय
Cristiano Ronaldo
तुरिन (इटली) - युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आज खेळल्या गेलेल्या सामन्यात युव्हेंट्स संघाने दुसऱ्या लेगमध्ये अॅटलेटिको माद्रिदचा ३-० गोरफरकाने पराभव केला. या विजयासह युव्हेंट्सने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
या सामन्यात स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्रीक करत युव्हेंट्सला एकहाती विजय मिळवून दिला. रोनाल्डोने २७, ४९ आणि ८९ मिनिटाला गोल दागत हॅट्रीक साजरी केली. तसेच रोनाल्डो युएफा क्लब स्पर्धेत १२५ गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
स्पर्धेच्या पहिल्या लेग अॅटलेटिको माद्रिदने युव्हेंट्सचा २-० ने पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढत आज दुसऱ्या लेगमध्ये युव्हेंट्सने ३-० ने शानदार विजय साजरा केला.