महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेहमी हसतमुख, उत्तम क्षेत्ररक्षक आणि स्फोटक फलंदाज...रैनाचे ३४व्या वर्षांत पदार्पण - suresh raina birthday news

सुरेश रैनाचा २७ नोव्हेंबर १९८६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला. त्याचे वडील त्रिलोक चंद जम्मू-काश्मिरमधील रैनावारी येथील मुळ रहिवासी असून आई धरमशाला, हिमाचल प्रदेशची मुळ रहिवासी आहे.

cricketer suresh raina celebrating 34th birthday today
नेहमी हसमुख, उत्तम क्षेत्ररक्षक आणि स्फोटक फलंदाज...रैनाचे ३४व्या वर्षात पदार्पण

By

Published : Nov 27, 2020, 12:59 PM IST

नवी दिल्ली -टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने आज ३४व्या वर्षांत पदार्पण केले. नेहमी हसतमुख, उत्तम क्षेत्ररक्षक, स्फोटक फलंदाज अशी विशेषणे जपणाऱ्या रैनाने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. आयुष्याच्या पहिल्या 'इनिंग'नंतर त्याने वंचित मुलांना शिकण्याची संधी मिळावी म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा प्रचार करण्याचा वसा घेतला आहे.

सुरेश रैनाचे कुटुंब -

२७ नोव्हेंबर १९८६ला सुरेश रैनाचा उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला आहे. त्याचे वडील त्रिलोक चंद जम्मू-काश्मिरमधील रैनावारी येथील मुळ रहिवासी असून आई धरमशाला, हिमाचल प्रदेशची मुळ रहिवासी आहे. पण रैना कुटुंब उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे स्थायिक आहे. रैनाचे वडील निवृत्त मिलिटरी ऑफिसर आहेत.

सुरेश रैना आणि प्रियांका चौधरी -

सुरेश रैनाने ३ एप्रिल २०१५ला बालमैत्रीण प्रियांका चौधरीबरोबर विवाह केला. त्यानंतर त्यांना १४ मे २०१६ ला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी ग्रासिया ठेवले. तसेच यावर्षी त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाले. त्याचे नाव रिओ असे ठेवले आहे.

सुरेश रैना आणि टीम इंडिया -

भारताचा टी-२० स्टार असणाऱ्या रैनाने आत्तापर्यंत २२६ एकदिवसीय, ७८ आंतरराष्ट्रीय टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. टी-२० आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. रैनाने २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत. २०१७ पासून तो भारतीय संघाबाहेर होता.

आयपीएल कारकीर्द -

आयपीएलमध्ये रैनाची कारकीर्द नावारूपास आली. या स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात चेन्नई सुपर किंग्जने त्याला २.६ कोटींची बोली लावून संघात घेतले होते. रैनाने १९३ आयपीएल सामन्यांमध्ये ५३६८ धावा केल्या आहेत. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा, रैनाने गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते. यंदाच्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी रैनाने यूएई गाठले होते, मात्र काही कारणास्तव त्याला एकही सामना न खेळता माघारी परतावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details