लंडन -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्न एका मोठ्या प्रकरणात अडकला आहे. लंडन येथील घरात वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. या पार्टीमध्ये गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर येत होता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी वॉर्नविरोधात तक्रार दाखल केली आहे.
४९ वर्षीय वॉर्न सध्या अॅशेस मालिकेत समोलोचन करत आहे. त्यामुळे तो लंडन येथे वास्तव्यास आहे. लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानापासून वॉर्नचे घर पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. चौथ्या कसोटीपूर्वी वॉर्न आपली नवीन प्रेयसी आणि दोन वेश्यांसह पार्टी करत होता. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या घराच्या खिडक्या उघड्या असल्याने गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर सुरू होता.