महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेटपटू करुण नायरने केली कोरोनावर मात

By

Published : Aug 13, 2020, 3:37 PM IST

८ ऑगस्टला केलेल्या चाचणीमध्ये नायर कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्या अगोदर २ आठवडे तो विलगीकरणात होता. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याला बीसीसीआयच्या नियमांनुसार आणखी तीन चाचण्या कराव्या लागतील. त्यानंतरच तो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो.

Karun Nair
करुण नायर

हैदराबाद - भारतीय फलंदाज करुण नायरने कोरोनावर मात केली. दोन आठवड्यांपूर्वी नायरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल) मध्ये नायर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतो. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या मोसमासाठी येत्या काही दिवसात नायर रवाना होईल.

८ ऑगस्टला केलेल्या चाचणीमध्ये नायर कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्या अगोदर २ आठवडे तो विलगीकरणात होता. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याला बीसीसीआयच्या नियमांनुसार आणखी तीन चाचण्या कराव्या लागतील. त्यानंतरच तो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो.

करुण नायर आयपीएल कामगिरी

२०१८ पासून नायरने पंजाबसाठी १४ सामने खेळले आहेत. २०१८ च्या आयपीएलमध्ये त्याने ३०१ धावा केल्या होत्या तर गेल्या आयपीएलमध्ये त्याने पंजाबसाठी केवळ एक सामना खेळला. विरेंद्र सेहवागनंतर करुण नायर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकले आहे.

दरम्यान, येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात येत आहे. युएईमधील शारजाह, दुबई आणि अबुदाबी या तीन ठिकाणी आठ संघ आपले सर्व सामने खेळतील.

ABOUT THE AUTHOR

...view details