मेलबर्न- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पुढील सहा महिने सीमारेषाबंदीची घोषणा केली आहे. यामुळे भारताचा ऑक्टोबर महिन्यातील बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौरा अडचणीत सापडला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दौऱ्याची सुरुवात तिरंगी टी-२० मालिकेने होणार होती, तर शेवट कसोटी मालिकेने होणार होता. आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा होता. पण, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे टी-२० विश्वकरंडकासह या दौऱ्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने सहा महिन्यासाठी सीमारेषाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणताही संघ या कालावधीत ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार नाही.