महाराष्ट्र

maharashtra

खळबळजनक..! दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू जिल्हा रुग्णालयातून पळाले...

By

Published : Mar 15, 2020, 7:55 PM IST

Updated : Mar 15, 2020, 8:30 PM IST

घडले असे की, दुबईतून १८ खेळाडू भारतात परतले. तेव्हा त्यांना विमानतळावरुन पनवेल महापालिकेच्या बस तसेच रुग्णवाहिकेतून थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची व्यवस्था टीव्ही, वाय-फाय तसेच इतर मनोरंजनाची साधनांनी सुसह्य अशा ग्रामविकास भवनात करण्यात आली आणि त्यांची कोरोनाची चाचणी रुग्णालयात घेण्यात आली. पण, रिपोर्ट येण्याआधीच त्या खेळाडूंनी ग्रामविकास भवनातून पळ काढला.

coronavirus : dubai return cricketers escaped from Panvel sub-district hospital
दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू पनवेल जिल्हा रुग्णालयातून पळाले...

नवी मुंबई - दुबईत स्थानिक टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील १८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा संपल्यानंतर हे खेळाडू मायदेशी परतले. तेव्हा कोरोना संशयित म्हणून त्यांना १४ दिवस पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील ग्रामविकास भवनमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार होते. पण त्या खेळाडूंनी ग्रामविकास भवनमध्ये राहण्यास नकार देत रुग्णालयातून पळ काढला. यामुळे खळबळ उडाली.

घडले असे की, दुबईतून १८ खेळाडू भारतात परतले. तेव्हा त्यांना विमानतळावरुन पनवेल महापालिकेच्या बस तसेच रुग्णवाहिकेतून थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची व्यवस्था टीव्ही, वाय-फाय तसेच इतर मनोरंजनाची साधनांनी सुसह्य अशा ग्रामविकास भवनात करण्यात आली होती. तसेच त्यांची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच त्या खेळाडूंनी ग्रामविकास भवनातून पळ काढला.

खळबळजनक..! दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू जिल्हा रुग्णालयातून पळाले...

रुग्णालय प्रशासनाने खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते खेळाडू प्रशासनाला जुमानले नाहीत. अखेर त्यांनी रुग्णालय सोडले. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली.

जे खेळाडू रुग्णालयात परत येण्यास रुग्णालयात नकार देतील, त्या खेळाडूंवर पोलिसी कारवाई करत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना रुग्णालयात आणले जाईल, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी त्या खेळाडूंपैकी ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांची रवानगी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात करण्यात येणार आहे आणि इतर राहिलेले खेळाडूंना घरी सोडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, त्या १८ खेळाडूंपैकी ६ खेळाडू रुग्णालयात परतले असल्याचे समजते. पण अद्याप १२ खेळाडूंचा शोध लागलेला नाही. रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : १४ खेळाडूंनी पीएसएल लीग मध्यातच सोडून गाठलं घर

हेही वाचा -कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली

Last Updated : Mar 15, 2020, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details