मुंबई- कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान, भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेतकऱ्याने देवू केलेली मदत सर्वांच्याच कौतूकाचा विषय ठरली आहे.
अजिंक्यने उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ, त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात तो शेतकरी, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. मी गरीब शेतकरी असून आर्थिक मदत करु शकत नाही. पण मी माझी केळीचे पीक याकामी देऊ इच्छितो, असे सांगताना दिसून येत आहे.
अजिंक्यने त्या शेतकरीच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. तो म्हणतो, 'तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुम्ही किती देता, हे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या संकट काळात तुळजापूरच्या शेतकऱ्याच्या या पुढाकाराचे कौतुक.'
- तो शेतकरी काय म्हणतो....