महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : ख्रिस गेलकडून पाक गोलंदाजाचा समाचार.. एका षटकात मारले ६,६,४,४,६,६ - गेलवादळ

गेलने शादाब खानच्या एका ओव्हरमध्ये तब्बल ३२ धावा चोपल्या आहेत.

पाहा व्हिडिओ : ख्रिस गेलकडून पाक गोलंदाजाचा समाचार... एका षटकात मारले ६,६,४,४,६,६

By

Published : Aug 4, 2019, 10:00 AM IST

कॅनडा - धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असला तरी त्याचा फलंदाजीचा झंझावात थांबलेला नाही. कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शादाब खान

गेलने शादाब खानच्या एका ओव्हरमध्ये तब्बल ३२ धावा चोपल्या आहेत. ग्लोबल टी-20 लीगमध्ये वँकुअर नाईट्स आणि एडमोन्टन रॉयल्स यांच्यात सामना चालू होता. या सामन्यात वँकुअर नाईट्सकडून खेळणाऱ्या गेलने १३ व्या ओव्हरमध्ये हा पराक्रम केला आहे.

यूनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलने या सामन्यात ४४ चेंडूत ९४ धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये गेलने ६ चौकार आणि ९ षटकार मारले. एडमोन्टन रॉयल्स यांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बळींच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या होत्या. पण, वँकुअर नाईट्सने हे आव्हान ४ बळींच्या मोबदल्यातच पूर्ण केले.

ABOUT THE AUTHOR

...view details