महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धावांचा 'बकासुर' झाला दहा हजारी मनसबदार, १४ षटकारांसह केली दिडशतकी खेळी - ICC

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय  क्रिकेटमध्ये गेलच्या १० हजार धावा पूर्ण

chris gayle

By

Published : Feb 28, 2019, 2:44 PM IST

सेंट जॉर्जेस - विडिंज आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आलेल्या चौथ्या वनडे सामन्यात धावांचा पाऊस पाहयाला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघानी मिळून तब्बल ८०७ धावा केल्या. यात इंग्लंडकडून जोस बटलरने (१५०) तर विडिंजकडून ख्रिस गेलने (१६२) धावांची दिडशतकी खेळी साकारली.

बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने विडिंजसमोर ४१८ धावा उभारल्या. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजच्या ख्रिस गेलने ९७ चेंडूंत १६२ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत ११ चौकार व १४ षटकार पाहायला मिळाले. या खेळीसह त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावे नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०० षटकार खेचणारा गेल हा जगातला पहिला खेळाडू बनला आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेलच्या १० हजार धावा पूर्ण

काल खेळल्या गेलेल्या सामन्यात ख्रिस गेलने वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातला १४ वा तर विंडिजचा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विंडिजकडून महान फलंदाज ब्रायन लारा यांनी हा पराक्रम केला आहे. गेलने वनडेत २८८ सामन्यांमध्ये १० हजार ७४ धावा केल्या आहेत. यात २५ शतंकाचा, ५० अर्धशतकांचा आणि एका द्विशतकाचाही समावेश आहे.

ग्रेनाडातील राष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने विजयासाठी विडिंजपुढे ४१९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजच्या संघ ३८९ धावांवर गारद झाल्याने २९ धावांनी इंग्लंडचा विजय झाला. या विजयामुळे इंग्लंडच्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details