महाराष्ट्र

maharashtra

चेतेश्वर पुजाराला खेळायचंय आयपीएल, म्हणतो...

By

Published : Jan 31, 2021, 3:58 PM IST

आयपीएलच्या शेवटच्या सहा लिलावांमध्ये पुजाराला 'अनसोल्ड' राहिला. २०१०मध्ये कोलकाता नाइट रायडर्सबरोबर आयपीएल पदार्पण करणाऱ्या ३३ वर्षीय पुजाराने २०१४मध्ये आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता. एका संकेतस्थळाशी बोलताना पुजारा म्हणाला की, मला आयपीएलचा एक भाग व्हायचे आहे. जर मला संधी मिळाली तर, मला खात्री आहे की मी चांगले काम करून दाखवेन.

IPL and Cheteshwar Pujara
IPL and Cheteshwar Pujara

नवी दिल्ली -भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने जगातील सर्वात मोठी टी-२० लीग इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली तर नक्कीच चांगली कामगिरी करायला आवडेल, असे पुजाराने सांगितले.

चेतेश्वर पुजारा

आयपीएलच्या शेवटच्या सहा लिलावांमध्ये पुजाराला 'अनसोल्ड' राहिला. २०१०मध्ये कोलकाता नाइट रायडर्सबरोबर आयपीएल पदार्पण करणाऱ्या ३३ वर्षीय पुजाराने २०१४मध्ये आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता. एका संकेतस्थळाशी बोलताना पुजारा म्हणाला की, मला आयपीएलचा एक भाग व्हायचे आहे. जर मला संधी मिळाली तर, मला खात्री आहे की मी चांगले काम करून दाखवेन.

केकेआरव्यतिरिक्त २०११ ते २०१३ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पुजाराने आयपीएल स्पर्धा खेळली आहे. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या ३० आयपीएल सामन्यांमध्ये त्याने ९९.७४च्या स्ट्राईक रेटने ३९० धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे पुजारा कसोटीपटू म्हणून ओळखला जात असला तरी, टी-२० स्वरुपात ६१ चेंडूंत शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. २०१९मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना त्याने रेल्वेविरुद्ध हे शतक साकारले होते.

हेही वाचा - विराटला आऊट करायचे कसे, इंग्लंड खेळाडूला पडला प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details