महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 1, 2019, 7:57 PM IST

Updated : May 1, 2019, 11:43 PM IST

ETV Bharat / sports

चेन्नईचा दिल्लीवर ८० धावांनी विजय, ताहिर-जाडेजा चमकले

इम्रान ताहिरने १२ धावात ४ बळी घेतले तर रवींद्र जाडेजाने ९ धावात ३ गडी बाद केले.

चेन्नईचा दिल्लीवर ८० धावांनी विजय

चेन्नई - रवींद्र जाडेजा आणि इम्रान ताहिर यांच्या जादुई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर दणदणीत ८० धावांनी विजय मिळविला. चेन्नईने दिल्लीपुढे १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दिल्लीचा संपूर्ण संघ ९९ धावांवरच ढेपाळला.
१८० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरेलल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. शिखर धवनने १९ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर वगळता इतर कोणत्याही फलंदाजास लौकिक अशी कामगिरी करता आली नाही.


चेन्नईकडून सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने दिल्लीच्या संघास चेन्नईचे आव्हान पेलता आले नाही. दीपक चाहर आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. इम्रान ताहिरने १२ धावात ४ बळी घेतले तर रवींद्र जाडेजाने ९ धावात ३ गडी बाद केले.


प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. शेन वॉटसन याला भोपळाही फोडता आला नाही. त्याला सुचितने बाद केले. त्यानंतर डुप्लेसिस (३९) आणि सुरैश रैना (५९) यांनी सामन्यांची सूत्रे हाती घेतली. सुरेश रैनाने ३७ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि १ षटकार खेचला.


त्यानंतर महेंद्र सिंह धोनीने २२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्यात ३ खणखणीत षटकार आणि ४ चौकार मारले. शेवटच्या दोन षटकात रवींद्र जाडेजाने १० चेंडूत २५ धावा वसूल केल्या. दिल्लीकडून सुचितने २८ धावात २ गडी बाद केले तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

Last Updated : May 1, 2019, 11:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details