नवी दिल्ली - इंडियन प्रिमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य राहिलेला स्टार फिरकीटपटू शादाब जकातीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातातून निवृत्ती घेतली. ३९ वर्षीय शादाबने याची घोषणा ट्विटरवरुन केली.
मूळचा गोव्याचा असलेला शादाब आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लॉयन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू या फ्रेंचायझींसाठी खेळला आहे. भारतीय संघात खेळण्याची संधी शादाबला मिळाली नाही. शाबाद चेन्नई सुपर किंग्जने पटकावलेल्या ३ विजेतेपदात (२ आयपीएल आणि १ चॅम्पियन्स लीग ) संघाचा सदस्य राहिला आहे.
शादाबने ट्विटव्दारे सांगितले की, 'क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मी निवृत्तीची घोषणा करतो. मी मागील वर्षभरात जास्त क्रिकेट खेळू शकलो नाही. हे माझ्या जीवनातील सर्वात कठिण गोष्ट राहिली. मी बीसीसीआय, गोवा क्रिकेटचा आभारी आहे. त्यांनी मला प्रिय असलेले क्रिकेट खेळण्याची २३ वर्षे संधी दिली.'