शारजाह -महिलांच्या चॅलेंजर्स टी-२० स्पर्धेत स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स आणि हरमनप्रित कौरचा सुपरनोव्हाज यांच्यात फायनल होणार आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाजकडून खेळणाऱ्या चमारी अट्टापट्टूने संघाकडून तडाकेबंद कामगिरी केली आहे. ट्रेलब्लेझर्स विरुद्धच्या सामन्यात तिने दमदार अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
सामन्यानंतर चमारी अट्टापट्टूने पॉवर-हिटिंग मागील रहस्य सांगितले आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सुपरनोव्हाजच्या सेलमन, जेमिमा रॉड्रिग्स, हरमप्रीत कौर आणि अट्टापटू यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात, जेमिमा अट्टापटूला प्रश्न विचारते, त्यावर तीन मसाला डोसा आणि मसाला ऑम्लेट हे माझ्या पॉवर हिटिंगचे रहस्य असल्याचे अट्टापटूने सांगताना पाहायला मिळत आहे.