महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

GT20 league : कर्णधार युवीचा धडाका; रंजक सामन्यात टोरंटो नॅशनल्स विजयी

या सामन्यात युवराज सिंगने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत २१ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.

By

Published : Jul 28, 2019, 2:00 PM IST

GT20 league : कर्णधार युवीचा धडाका; रंजक सामन्यात टोरंटो नॅशनल्स विजयी

नवी दिल्ली -पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या टोरंटो नॅशनल्सचा कर्णधार युवराज सिंगला सूर गवसला आहे. एडमन्टन रॉयल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात युवीने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात हातभार लावला.

या सामन्यात युवराज सिंगने आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत २१ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. टोरंटो नॅशनल्स संघाने नाणेफेक जिंकून एडमन्टन रॉयल्स विरुद्ध क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फंलदाजीमध्ये रॉयल्सच्या संघाने टोरंटो संघाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत २० षटकांमध्ये १९१ धावा रचल्या. रॉयल्सचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर शेवटी आलेल्या अष्टपैलू बेन कटिंगने २४ चेंडूत ४३ धावांची आतषबाजी खेळी केली. टोरंटोकडून क्रिस ग्रीनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

१९२ धावांचा पाठलाग करताना टोरंटो नॅशनल्सची सलामीची जोडी अपयशी ठरली. २९ धावांमध्ये दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर युवी आणि हेनरीक क्लासेनने ५५ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला. युवी बाद झाल्यानंतर संघाचा डाव परत कोलमडला. टोरंटोची ७ बाद १२५ अशी धावसंख्या असताना मनप्रीत गोनीने मोर्चा सांभाळला. त्याने १२ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३३ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीमुळे टोरंटोने आठ गड्यांच्या मोबदल्यात १७.५ षटकांत आव्हान गाठले.

ABOUT THE AUTHOR

...view details