नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने इयान मॉर्गनचे कौतुक केले आहे. मॉर्गनने यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भार आपल्या खांद्यावर घेतला असल्याचे हॉगने सांगितले. मॉर्गनने रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची धमाकेदार खेळी केली.
''कोलकाताचा संपूर्ण भार मॉर्गनने आपल्या खांद्यावर घेतला'' - Eoin Morgan performance for KKR
ब्रॅड हॉगने इयान मॉर्गनचे कौतुक केले आहे. हॉगने ट्विटरवर म्हटले, "कोलकाताचे दोन दिवस प्रचंड चिंताजनक आहेत . होय, पॅट कमिन्सने उत्कृष्ट कामगिरी केली. इयान मॉर्गनने संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि शुबमन गिलला साथ दिली." या सामन्यात कोलकाताने २० षटकांत ७ गडी गमावून १९१ धावा केल्या. कोलककाताने हा सामना ६० धावांनी जिंकून प्ले-ऑफच्या आशा कायम राखल्या आहेत.
हॉगने ट्विटरवर म्हटले, "कोलकाताचे दोन दिवस प्रचंड चिंताजनक आहेत . होय, पॅट कमिन्सने उत्कृष्ट कामगिरी केली. इयान मॉर्गनने संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि शुबमन गिलला साथ दिली." या सामन्यात कोलकाताने २० षटकांत ७ गडी गमावून १९१ धावा केल्या. कोलककाताने हा सामना ६० धावांनी जिंकून प्ले-ऑफच्या आशा कायम राखल्या आहेत.
मॉर्गनने या मोसमात कोलकाताकडून ४१८ धावा केल्या आहेत. त्यांच्या आधी गिलने ४४० धावा केल्या आहेत. पॅट कमिन्सने १४ सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. या मोसमात कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने १३ सामन्यांत १७ बळी घेतले आहेत. कोलकाता सध्या १४ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे.