'माझ्यासमोर वर्ल्डकप फायनलमध्ये जरी कोहली आला, तरी मी अश्विनसारखे कृत्य करणार नाही' - बेन स्टोक्स - shane warne
अश्विन-बटलर वादावर बेन स्टोक्सने ट्विट करत मांडली आपली भूमिका
ben stokes
जयपूर - आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अम्बेसेडर असेलेल्या शेन वॉर्नने अश्विन-बटलर वादावर ट्विट करत एक सवाल उपस्थित केला होता. वॉर्न म्हणाला होता की, अश्विनसारखे वर्तन जर बेन स्टोक्सने विराट कोहलीसोबत केले असते तर..? वॉर्नच्या या प्रश्नाचे उत्तर देताना राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू स्टोक्सने एक ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.
स्टोक्सने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'मला आशा आहे, की मी आगामी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेन आणि त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मी गोलंदाजी करत असताना विराट कोहली फलंदाजी करत असला तरीही मी अश्विनसारखे कृत्य करणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतो'.
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामिवीर जोस बटलरला ६९ धावांवर अश्विनने विचित्र पद्धतीने धावबाद केले होते. बटलरची विकेट हा या सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला आणि राजस्थानला १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरून अश्विनवर संताप व्यक्त केला आहे.