अबुधाबी - बेन स्टोक्सच्या ६० चेंडूत नाबाद १०७ धावा आणि त्याने संजू सॅमसनसोबत केलेल्या तिसऱ्या गड्यासाठी १५२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने बलाढ्य मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ मुंबईसमोर गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. दरम्यान, या सामन्यात स्टोक्सने शतकानंतर मधल बोट लपवून सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे गुपित समोर आले आहे.
बेन स्टोक्सचे वडील कॅन्सरशी झगडत आहेत. त्यांच्यावर न्यूझीलंडमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे बेन स्टोक्सने इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. तसेच तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही, या बाबत संशाकता होती. पण, तो अखेर आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये पोहोचला. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली. शतकानंतर त्याने मधल बोट लपवून सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनमागे एक भावनिक कारण आहे.
काय आहे स्टोक्सच्या त्या सेलिब्रेशनचे गुपित -