मुंबई- भारतात २०२१ साली होणाऱया टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०२३ साली होणाऱया एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी १५० कोटीचा कर बीसीसीआयलाच भरावा लागणार आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आयसीसीला इतर सदस्य देशांकडून करमाफी दिली जाते. ही करमाफी इतर खेळातही मिळते. भारतात ही करमाफी मिळत नसल्याने फॉर्म्युला-१ च्या कार्यक्रमपत्रिकेतूनही भारताला वगळण्यात आले होते. आता, आयसीसीनेही यासंबंधी निर्णय घेताना स्पष्ट केले की, विश्वकरंडकाच्या आयोजनाचा कर हा बीसीसीआयलाच भरावा लागणार आहे.