मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) त्रैमासिक बैठकीत बीसीसीआयला सांगितले होते, की भारताला जर २०२१ सालचा टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०२३ सालचा एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धांचे आयोजन करायचे असल्यास करामध्ये सुट द्यावी लागेल. बीसीसीआयने करात सुट दिली नाही तर, विश्वकरंडकाचे आयोजनपद भारताकडून काढून घेण्यात येईल.
आयसीसीच्या या भूमिकेवर बोलताना बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आयसीसी विश्वकरंडकाचे आयोजनपद भारताकडून काढून घेवू शकतो. यासाठी आमची हरकत नाही. करमाफी ही सरकारच्या हातात आहे, यासाठी मंजूरी मिळणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या दबावात येवून आम्ही आयसीसीची मदत करू शकत नाही.