महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विंडीज दौरा : गब्बर इज बॅक तर कार्तिकला 'डच्चू', दीड वर्षांनी साहाचे पुनरागमन - एमएसके प्रसाद

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता.

विडींज दौरा : गब्बर इज बॅक तर कार्तिकला 'डच्चू', दीड वर्षांनी साहाचे पुनरागमन

By

Published : Jul 21, 2019, 4:33 PM IST

मुंबई- बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताला पराभूत व्हावे लागले. यामुळे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात येईल, असे बोलले जात होते. मात्र, विराटला या दौऱ्यासाठी तिन्ही प्रकारात कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ आणि टी-२० प्रकारात नविन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर कसोटीच्या संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून यामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने दीड वर्षानी पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

वृद्धीमान साहाला दीड वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुध्द दुखापत झाली होती. आता त्याचे विंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत संघामध्ये स्थान मिळवलेला यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. यामुळे कार्तिकचे वय पाहता त्याचे आतंरराष्ट्रीय करिअर आता जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा आहे. विश्वकरंडक स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळूनही विशेष कामगिरी करता आली नाही. आता वेस्ट इंडीजच्या दौऱ्यातून त्याला वगळल्याने निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता.

  • असे आहे रिप्लेसमेंट -

महेंद्रसिंह धोनी - ऋषभ पंत
दिनेश कार्तिक - वृध्दीमान साहा

  • टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

  • एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

  • कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

ABOUT THE AUTHOR

...view details