कराची- पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण बीसीसीआयने नाकारले आहे. दोन्ही देशांत चालू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अंतिम सामना पाहण्याचे पाकिस्तानचे निमंत्रण बीसीसीआयने नाकारले - एहसान मनी
पीएसएलचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांना पाठवण्यात आले होते.
पीसीबीचे अध्यक्ष म्हणाले, १७ मार्च रोजी कराची येथे होणाऱ्या पीएसएलच्या अंतिम सामन्यात उपस्थित राहण्याचे आमंत्रण बीसीसीआयने नाकारले आहे. आयसीसी आणि पीसीबी बोर्डाची मान्यता असलेल्या पीएसएलचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांना पाठवण्यात आले होते. परंतु, काही वैयक्तीक समस्यांमूळे त्यांनी येण्यास नकार दिला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.