नवी दिल्ली -आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी रोहित शर्माला संघात स्थान न मिळाल्यामुळे निवड समितीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहितच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीचे कारण सांगून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेसाठी निवड केलेल्या तिन्ही संघातून रोहितला वगळले आहे. आता बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रविवारी रोहित शर्माच्या तंदुरूस्तीचे मूल्यांकन करेल.
एका वृत्तानुसार, रोहितच्या तंदुरुस्तीबाबत वैद्यकीय पथक निर्णय घेईल. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की "उद्या रविवारी (१ नोव्हेंबर) रोहितच्या दुखापतीची माहिती घेतली जाईल आणि ऑस्ट्रेलियाला त्याचे जाणे योग्य आहे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल."