मुंबई- बीसीसीआयने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या २ टी-ट्वेन्टी आणि ५ एकदिवसीय सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. संघात कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. तसेच, खराब फॉर्ममध्ये असलेल्या के.एल. राहुलला एकदिवसीय सामन्यांसाठी संधी देण्यात आली असून दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून २ सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळणार आहे. या टी-ट्वेन्टी सामन्यासाठी नवोदित मयांक मार्कंडेयला कुलदीप यादवच्या जागी संधी देण्यात आली आहे. कुलदीपला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे.
भारतीय टी-ट्वेन्टी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयंक मार्केंडेय.
पहिल्या २ एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, केएल राहुल.
शेवटच्या ३ एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर, केएल राहुल, ऋषभ पंत.