महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अष्टपैलू खेळाडूकडे बडोद्याचे नेतृत्व

बडोदाला गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह एलिट ग्रुप सीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व कृणाल पांड्या करणार आहे.

Baroda squad for the Syed Mushtaq Ali Trophy
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अष्टपैलू खेळाडूकडे बडोद्याचे नेतृत्व

By

Published : Jan 3, 2021, 9:25 AM IST

बडोदा - १० जानेवारीपासून सुरू होणार्‍या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या बडोदा संघाचे नेतृत्व करणार आहे. कृणालव्यतिरिक्त दीपक हुड्डाचा बडोदाच्या २२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

कृणाल पांड्या

बडोदा क्रिकेट असोसिएशनने आपल्या संकेतस्थळावर संघाची घोषणा केली. अनुभवी सलामीवीर केदार देवधर आणि उजवा फलंदाज विष्णू सोलंकी हेदेखील या संघात आहेत. डेव्ह व्हॉटमोर संघाच्या प्रशिक्षकपदी जोडले न गेल्यामुळे असोसिएशनने प्रभाकर बेअरगोंड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.

बडोदाला गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह एलिट ग्रुप सीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

संघ -

कृणाल पांड्या, दीपक हुड्डा, केदार देवधर, निनाद राठवा, स्मित पटेल, विष्णू सोलंकी, अभिमन्यू राजपूत, ध्रुव पटेल, अतीत सेठ, बाबासाफी पठाण, एल मेरीवाला, मोहित मोंगिया, भानू पानिया, कार्तिक काकडे, चिंतल गांधी, प्रदीप यादव, सोयेब सोपिया , अंश पटेल, पार्थ कोहली, भार्गव भट्ट, प्रितीक घोडादरा आणि प्रत्युष कुमार.

मुख्य प्रशिक्षक : प्रभाकर बैरगोंड

ABOUT THE AUTHOR

...view details