महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राशिद खान : 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिलाच कर्णधार - साकिब अल हसन

यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघामध्ये चित्तगावच्या जहूर अहेमद चौधरी मैदानावर एकमेव कसोटी सामना रंगला होता. या सामन्यात नवख्या अफगाणिस्तानने अनुभवी साकिब अल हसनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या बांगलादेशचा २२४ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर अफगाणिस्तानने पहिला कसोटी मालिका जिंकली आहे.

राशिद खान

By

Published : Sep 9, 2019, 10:30 PM IST

ढाका - यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघामध्ये चित्तगावच्या जहूर अहेमद चौधरी मैदानावर एकमेव कसोटी सामना रंगला होता. या सामन्यात नवख्या अफगाणिस्तानने अनुभवी साकिब अल हसनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या बांगलादेशचा २२४ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर अफगाणिस्तानने पहिली कसोटी मालिका जिंकली आहे.

हेही वाचा -सचिन तेंडलकर : पदार्पणानंतर ५ वर्षांनी ठोकले पहिले शतक

कसोटीचा दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तानच्या संघाने एकूण ३ कसोटी सामने खेळली आहे. यात अफगाणिस्तानने आयरलँडवर विजय मिळवला होता, भारता विरुध्दच्या सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र, यावेळी संघाची धुरा होती ती असगर अफगान यांच्याकडे. आता युवा राशिद खान संघाचे नेतृत्व करत आहे. राशिदने बांगलादेशचा पराभव करत, एक नाही तर दोन विक्रम केले आहेत.

हेही वाचा -Ban vs Afg Test : अफगाणिस्तानच्या 'पठाणां'नी केली बांगलादेशी वाघांची शिकार

पहिला विक्रम म्हणजे, राशिद खान हा सर्वात युवा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात पहिल्याच कसोटी सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. याशिवाय राशिदने या सामन्यात कर्णधारपदाच्या विक्रमासह फलंदाजीमध्ये अर्धशतक ठोकले आणि गोलंदाजीत ११ गडी बाद केले. असा विक्रम जगातील कोणत्यातही कर्णधाराला करता आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details