महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गांगुलीमुळेच मी दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी आले - शेख हसीना - भारत विरुध्द बांगलादेश

भारतामध्ये प्रथमच होणाऱ्या या दिवस-रात्र कसोटी सामन्याचा शेख हसीना यांनी आनंद लुटला. त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. दरम्यान, सौरव गांगुलीच्या बोलवण्यावरुन मी हा सामना पाहण्यासाठी आले असल्याचे शेख हसीना यांनी सांगितलं.

गांगुलीमुळेच मी दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी आले - शेख हसिना

By

Published : Nov 23, 2019, 8:37 PM IST

कोलकाता - भारत आणि बांगलादेश संघात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना रंगला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही या सामन्याला हजेरी लावली आहे. शेख हसीना यांनी मैदानातील घंटा वाजवून ऐतिहासिक सामन्याला सुरुवात केली.

भारतामध्ये प्रथमच होणाऱ्या या दिवस-रात्र कसोटी सामन्याचा शेख हसिना यांनी आनंद लुटला. त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. दरम्यान, सौरव गांगुलीच्या बोलवण्यावरुन मी हा सामना पाहण्यासाठी आले असल्याचे शेख हसीना यांनी सांगितलं.

याविषयी बोलताना शेख हसीना यांनी सांगितलं की, 'सौरव गांगुलीच्या निमंत्रणावरुन मी कोलकातामध्ये आले. मला भारत-बांगलादेश संघातील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचे साक्षीदार होता आले. भारतीय प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं, यामुळे मी त्यांचे आभार मानते.'

दरम्यान, ऐतिहासिक दिवस-रात्र सामना होण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे आभार सौरव गांगुलीने मानले आहे.

हेही वाचा -INDvBAN: आफ्रिकेविरुध्द षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या उमेशच्या नावे झाला नकोसा विक्रम

हेही वाचा -IND VS BAN : विराटची ऐतिहासिक शतकी खेळी, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details