महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशचा क्रिकेट संघ गेलेल्या मशिदीवर अज्ञाताचा अंदाधुंद गोळीबार; थोडक्यात बचावला संघ - खाइस्टचर्च

बांगलादेशचा संघ शहरातील मशिदीत गेला होता. यावेळी अज्ञात इसमाने मशिदीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बांगलादेशचा संघ सुखरुप बचावला आहे.

बांगलादेश ११

By

Published : Mar 15, 2019, 11:10 AM IST

ख्राइस्टचर्च - बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱयावर आहे. बांगलादेशच्या संघाचा न्यूझीलंड दौऱयातील शेवटचा तिसरा कसोटी सामना १६ मार्चपासून ख्राइस्तचर्च येथे सुरू होणार आहे. त्याआधी बांगलादेशचा संघ शहरातील मशिदीत गेला होता. यावेळी अज्ञात इसमाने मशिदीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बांगलादेशचा संघ सुखरुप बचावला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता जलाल युनुस म्हणाले, गोळीबाराच्या वेळेस संघातील सदस्य मशिदीच्या आतमध्ये होते. खेळाडू आता सुखरुप आहेत. परंतु, त्यांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही त्यांना हॉटेलमध्येच सुखरुपरित्या राहण्यास सांगितले आहे.

न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी हा सर्व प्रकार घडला. एका बंदुकधारी माणसाने ऑटोमॅटिक बंदूक घेवून मशिदीच्या मागच्या बाजून आला. त्याने तेथील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात बांगलादेशचा संघ सुखरुप बचावला असला तरीही गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details