मेलबर्न -ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीनंतर देखील बायो सिक्युर बबलमध्ये राहणार आहे. यामुळे त्यांना बिग बॅश लीगसाठी पुन्हा आयसोलेट व्हावे लागणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्याची मालिका १९ जानेवारीला समाप्त होईल. त्यानंतर प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासह बिग बॅश लीगचे १६ सामने खेळवले जाणार आहेत.
मोयसेस हेनरिक्स (सिडनी सिक्सर्स), मायकल नेसर (एडिलेड स्ट्राइकर्स), मिशेल स्वेप्सन (ब्रिस्बेन हीट), जेम्स पॅटिन्सन आणि मार्कस हॅरिस (मेलबर्न रेनेगेड्स) हे नियमित बिग बॅश लीगमध्ये खेळत असतात.
ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नरची वापसी
बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर, सिन अबॉट आणि नवोदीत विल पुकोव्सकी परतले आहेत. तर खराब कामगिरी करणाऱ्या जो बर्न्सला संघातून वगळण्यात आले आहे.