महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्मिथच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय - Glenn Maxwell

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही स्मिथने 89 धावांची खेळी केली होती

स्मिथ

By

Published : May 10, 2019, 5:03 PM IST

ब्रिस्बेन -न्यूझीलंड एकादश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कांगारुंनी ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारीत ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत २८६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हन स्मिथच्या शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ वनडे सामन्यांची ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे.

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने १०८ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल ४८ चेंडूत ७० धावांची वादळी खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ४४ षटकामध्ये २४८ धावांवर खेळत असताना पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईस नियमानुसार त्यावेळी ऑस्ट्रेलिया १६ धावांनी पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details