महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind Vs Aus : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; पुकोस्वकीसह युवा खेळाडूंना संधी - भारत वि. ऑस्ट्रेलिया

भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात कॅमरॉन ग्रीन, मायकल नेसर, विल पुकोस्वकी आणि मिशेल स्वेपसन या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

australia-vs-india-2020-pucovski-cameron-green-sean-abbott-named-australia-test-squad
Ind Vs Aus : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; पुकोस्वकीसह युवा खेळाडूंना संधी

By

Published : Nov 14, 2020, 1:49 PM IST

मेलबर्न - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात युवा खेळाडू कॅमरॉन ग्रीन याला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय मायकल नेसर, विल पुकोस्वकी आणि मिशेल स्वेपसन यासारख्या नव्या दमाच्या खेळाडूंचीही निवड ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टिम पेनच्या नेतृत्वाखाली १७ सदस्य असलेला एक संघ निवडला आहे. दरम्यान उभय संघात चार कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार असून या मालिकेला १७ डिसेंबरपासून अ‌ॅडलेडमध्ये सुरूवात होणार आहे.

पुकोवस्कीला संघात स्थान

शेफील्ड शील्डमध्ये शानदार कामगिरी करणारा युवा खेळाडू पुकोवस्कीला ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना पाहायला मिळतील. मार्कस लाबुशेन, ट्रेविड हेडही यांचाही ऑस्ट्रेलिया संघात समोवश आहे. नॅथन लिओनवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीची मदार आहे. त्याला मिशेल स्वेपसन यांची साथ असणार आहे.

मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या वेगवान त्रिकूटाचा समावेश देखील संघात आहे. याशिवाय जेम्स पॅटिन्सनही आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी मॅथ्यू वेड याच्याकडे आहे. तर युवा अष्टपैलू म्हणून कॅमरोन ग्रीन याची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रीनचा समावेश एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठीही ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ -

डेव्हिड वार्नर, जो बर्न्स, स्टिव्ह स्मिथ, कॅमरोन ग्रीन, सीन एबॉट, पॅट कमिंन्स, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नाथन लिओन, मायकल नेसर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टॉर्क, मॅथ्यू वेड, विल पुकोस्वकी आणि मिशेल स्वेपसन.

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी-२० संघ -

अ‌ॅरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, अ‌ॅश्टन एगर, अ‌ॅलेक्स कॅरी, पॅट कमिंन्स, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवुड, मोयजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टॉर्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अ‌ॅडम झम्पा.

ABOUT THE AUTHOR

...view details