सिडनी -गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी विश्वचषक-२०१९ च्या स्पर्धेत नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून आपल्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. कांगारू संघाने आपल्या जर्सीसाठी पारंपरिक पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर कलेला आहे.
ऑस्ट्रेलिया संघासाठी जर्सी बनवणाऱ्या ASICS या कंपनीने ग्लेन मॅक्सवेलचा नव्याकोऱ्या जर्सीतील फोटो शेयर करत नव्या जर्सीचे अनावरण केले. या नव्या जर्सीत पाच वेळचा विश्वचषक विजेता आणि गतविजेता असलेला ऑस्ट्रेलियन संघ विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.