ब्रिस्बेन -मागच्या आठवड्यात व्हिक्टोरिया क्विन्सलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात बेशिस्त वर्तन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने पॅटिन्सनवर एका सामन्याची बंदी घातली आहे.
हेही वाचा -शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !
क्विन्सलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात पॅटिन्सनने समोरच्या संघातील एका खेळाडूला शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पॅटिन्सनने माफी मागितली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे तो गुरुवारपासून पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी लढतीला तो मुकणार आहे.
मी विरोधी संघ आणि पंच यांच्याकडे सदर प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी चूक केली आहे आणि शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे पॅटिन्सनने म्हटले आहे.
आचारसंहितेच्या दुसर्या स्तराचे उल्लंघन केल्याबद्दल पॅटिन्सनला दोषी ठरवण्यात आले आहे. गेल्या १८ महिन्यांत तिसऱ्यांदा त्याने आचारसंहितेचा भंग केला असल्याने त्याच्यावर सामन्यासाठी बंदी घालण्यात आली.