सिडनी - आजपासून (१ जानेवारी) ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रगीताची वेगळी आवृत्ती गायली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी राष्ट्रगीतामधील काही शब्द बदलण्याची घोषणा केली होती.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रगीताने ऑस्ट्रेलियाला “तरुण आणि मुक्त” म्हणून संबोधलेले नाही. त्यामुळे मागील गुरूवारी सरकारने यामध्ये बदल करण्याचे जाहीर केले होते.
हा बदल देशवासीयांमध्ये "एकात्मतेची भावना" निर्माण करेल, अशी आशा पंतप्रधान मॉरिसन यांनी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतामधून अॅडव्हास ऑस्ट्रेलिया फेअर हा शब्द वगळलेला आहे. त्याजागी तरुण व मुक्त अशी सुधारणा केली आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला न्यू साऊथ वेल्स राज्याचे प्रमुख ग्लॅडी बेरेजीक्लीन यांनी राष्ट्रगीतामध्ये बदलाची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, राष्ट्रगीतातून ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीचे दर्शन होत नाही.
नवीन बदलामुळे आम्ही एक राष्ट्र म्हणून आपण ज्या अंतरावर प्रवास केला आहे त्याची ओळख होते. आमची राष्ट्रीय कथा 300 हून अधिक राष्ट्रीय वंशाच्या आणि भाषेच्या समुहाद्वारे रेखाटली गेली आहे. आम्ही जगातील सर्वात यशस्वी बहुसांस्कृतिक राष्ट्र आहोत, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.