मेलबर्न - कोरोना विषाणू हा विषय आपण गंभीरतने घेत याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आपण फक्त स्वत: विषयी विचार न करता दुसऱ्याचाही विचार करावा, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाने केलं आहे. ख्वाजाने यासंदर्भात ट्विट करत हे आवाहन केलं आहे.
ख्वाजा म्हणतो की, कोरोना विषाणुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून याकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली जबाबदारी आहे की, आपण वृद्ध नागरिकांविषयी विचार केला पाहिजे. तसेच कोरोनामुळे सामाजिक तथा आर्थिक होणारे परिणाम याचाही विचार करायला हवा. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून खबरदारी बाळगायला हवी.
दरम्यान, याआधी भारताचे खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हरभजन सिंग आदी जणांनी कोरोना विषाणूपासून खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपल्या चाहत्यांना खबरदारीचा संदेश देत आहेत.