मेलबर्न- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंशी २०२०-२१ या वर्षासाठी करार केला आहे. यात मार्नस लाबुशेनसह सहा नवीन खेळाडूंशी ऑस्ट्रेलिया बोर्डाने करार केला आहे. तर डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजासह ५ जणांना करारमुक्त केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, महिला खेळाडूंच्या करारामध्ये २०१७ पासून संघाबाहेर असलेल्या ताहिला मॅकग्रा हिला स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अॅशेसपासून फॉर्मात असलेल्या मार्नस लाबुशेनशी करार केला आहे. याशिवाय, अॅश्टन एगर, जो बर्न्स, मिशेल मार्श, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड यांच्याशीही करार करण्यात आला आहे. तर ख्वाजासह पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस हॅरिस, नाथन कूल्टर नाइनल आणि मार्कस स्टोयनिस यांना करारमुक्त करण्यात आले आहे.
लाबुशेनने २०१८ मध्ये पदार्पण केले. तो सद्य घडीला आयसीसीच्या कसोटी रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत १४ कसोटीत ६३ च्या सरासरीने १४५९ धावा केल्या आहे. त्याने २ एकदिवसीय सामने खेळली असून यात त्याची सरासरी ५० हून अधिक आहे. या कामगिरीचा फायदा लाबुशेनला झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने २० पुरुष खेळाडूंशी तर १५ महिला खेळाडूंशी करार केला आहे. ताहिला मॅकग्रा २०१७ पासून संघाबाहेर आहे पण तिच्याशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करार केला आहे. ताहिलाने शेवटचा सामना भारत अ संघाविरुद्ध खेळला होता. महिला खेळाडूंमध्ये टेआला व्लामिनेक आमि अॅनाबेल सदरलँड यांच्याशी करार करण्यात आला आहे. तर निकोल बोल्टन, एलिस विलानी आणि एरिन बर्न्स यांना करारमुक्त करण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करार केलेले पुरुष खेळाडू -