मेलबर्न- ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मालिकेतून बाहेर झाला आहे. तर, १ वर्षाची बंदी पूर्ण झाल्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना संघात जागा दिली नाही.
पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी शेवटच्या २ सामन्यांसाठी स्मिथ-वॉर्नर उपलब्ध होते. परंतु, निवड समितीने त्यांना संघात जागा दिली नाही. दोघांवरील १ वर्षाची बंदी २८ मार्चला संपत आहे. पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया २९ मार्चला चौथा तर ३१ मार्चला पाचवा सामना खेळणार आहे. स्मिथ-वॉर्नर यांनाही दुखापत झाली होती. परंतु, दोघेही सध्या तंदुरुस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलिया संघात समावेश झाला नसल्याने २३ मार्चपासून सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेत स्मिथ-वॉर्नर खेळताना दिसून येतील.