मेलबर्न- ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाविरोधातील बॉक्सिंग डे कसोटी २४७ धावांनी जिंकली आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने चपळता दाखवत फलंदाजाला यष्टीचित केले. पेनची चपळता पाहून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी चपळाईने यष्टीरक्षण करण्यासाठी ओळखला जातो. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोनी यष्ट्या उडवतो. असाच यष्टीरक्षणाचा नजारा मेलबर्नच्या मैदानावर पाहायला मिळाला.
बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४८८ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने सुरुवातीचे ३ फलंदाज अवघ्या ३५ धावांमध्ये परतले. यानंतर हेन्री निकोल्स फलंदाजीला आला आणि त्याने टॉम ब्लंडेल याच्यासोबत न्यूझीलंडचा डाव सारवला. मात्र डावाच्या तिसाव्या षटकामध्ये फिरकी गोलंदाज नॅथन लियोनच्या गोलंदाजीवर तो फसला आणि टिम पेनने चफळाईने त्याला यष्टीचित केले.