मुंबई - भारतीय कसोटी संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत तामिळनाडू संघाचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका २१ फेब्रुवारीपासून ते २ मार्च दरम्यान होणार आहे. गुरुवारी संघाची घोषणा करण्यात आली. पण त्या संघात मुरली विजयला स्थान देण्यात आले नाही. खराब फॉर्ममुळे त्याचा पत्ता कट करण्यात आला आहे.
युवा अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदरचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय टी-२० संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या विजय शंकरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.