नवी दिल्ली - अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारामध्ये बदल केला आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेआधी संघाचे नेतृत्व गुलबदीन नईबकडे देण्यात आले होते. बोर्डाने विश्व करंडक स्पर्धेनंतर पुन्हा कर्णधार बदलला आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाची कमान युवा राशिद खानकडे सोपवली होती.
अफगाणिस्तान आता पुन्हा बोर्डाने कर्णधारपदामध्ये बदल केला असून अनुभवी खेळाडू असगर अफगाणकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी संघाच्या नेतृत्वात बदल केला आणि कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये असगरकडे अफगाणिस्तानचे नेतृत्व दिले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.