मुंबई -सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबई टी-२० लीगच्या लिलावात ५ लाखांची बोली लागली आहे. आकाश टायगर्स MWS या संघाने सचिन'पुत्राला' आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे. या लिलावात अष्टपैलू कॅटेगरीत अर्जुनची बेस प्राईज अर्थात मुळ रक्कम १ लाख ठेवण्यात आली होती.
'या' टी-२० लीगसाठी अर्जुन तेंडुलकरला लागली ५ लाखांची बोली - Sachin Tendulkar
अर्जुनने तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर-१९ संघात पदार्पण केले होते
मुंबई टी-२० लीग ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळली जाते. अर्जुनने यापूर्वी विनू मांकड अंडर १९, कूँचबिहार करंडक, अंडर-१९ केसी महिंद्रा शील्ड आणि डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या जोरावर अर्जूनची अष्टपैलू खेळाडू म्हणून बीसीसीआयच्या वनडे लीगसाठी मुंबईच्या अंडर-२३ संघातही निवड करण्यात आली होती.
मुंबई टी-२० लीगच्या या मोसमात ८ संघांचा समावेश असून या लीगची सुरुवात १४ मेपासून वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे.