दुबई- अमेरिकेचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच टी-ट्वेन्टी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. युनायटेड अरब अमीरात विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी सौरभ नेत्रवलकरच्या नेतृत्वात १४ सदस्यीय संघ अमेरिकेने जाहिर केला आहे. या दौऱ्यात अमेरिका २ टी-ट्वेन्टी तसेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.
अमेरिका संघाचे निवडकर्ते रिकार्डो पॉवेल म्हणाले, युनायटेड अमिरात दौरा आयसीसीच्या दुसऱ्या स्तरावरील क्रिकेट लीगच्या तयारीसाठी महत्वपूर्ण आहे. या स्पर्धेद्वारे एकदिवसीय संघाचा दर्जा प्राप्त करणे, हे आमचे ध्येय आहे. अमेरिकेचे प्रशिक्षक पुबुडू दस्सानायके म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेला यायला खूप उशीर झाला. आम्ही आता युनायटेड अरब अमिरातच्या आव्हानाला तयार आहोत. याद्वारे आम्ही एकदिवसीय संघाचा दर्जा प्राप्त करण्यावर भर देणार आहोत.