मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा अंबाती रायुडूला संघात संधी देण्यात येईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, निवड समितीने अंबाती ऐवजी ऋषभ पंतला पसंती दिली. तेव्हा अंबातीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. यानंतर अनेकांनी निवड समिनीतीवर संताप व्यक्त केला. यावर आता विश्वकरंडक संपल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी भाष्य केले.
'आम्ही अंबाती रायुडूसोबत कधीही पक्षपातीपणा केला नाही'
जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड संघात होते. तो खेळाडू चांगली कामगिरी करतो. तेव्हा आम्हाला आनंद होतो. तसेच आम्ही जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड संघात करू शकत नाही. तेव्हा आम्हालाही वाईट वाटते. आम्ही रायुडूबाबत कधी पक्षपातीपणा केला नसल्याचे प्रसाद म्हणाले.
प्रसाद म्हणाले की, जेव्हा एखादा खेळाडूची निवड संघात होते. तो खेळाडू चांगली कामगिरी करतो. तेव्हा आम्हाला आनंद होतो. तसेच आम्ही जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड संघात करू शकत नाही, तेव्हा आम्हालाही वाईट वाटते. आम्ही रायुडूबाबत कधीही पक्षपातीपणा केला नाही.
आम्ही रायुडूच्या टी-२० च्या कामगिरीवरून संघात स्थान दिले. तेव्हा निवड समितीवर टीका झाली. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हा रायुडूची यो-यो टेस्ट झाली. तो या टेस्टमध्ये नापास झाला. त्यावेळी आम्ही त्याच्यासाठी एक महिन्याचा खास फिटनेस कार्यक्रम बनवला होता, असा दावा प्रसाद यांनी केला.