महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2020, 3:42 PM IST

ETV Bharat / sports

पाकिस्तानच्या अलीम दार यांचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पराक्रम

अलीम दार हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने पंचगिरी केलेले व्यक्ती ठरले आहेत. आज पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या सामन्यात त्यांनी ही कामगिरी रचली.

Alim dar became the umpire who officiated in most matches in odis
पाकिस्तानच्या अलीम दार यांचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पराक्रम

रावळपिंडी - क्रिकेट पंच अलीम दार यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठास पराक्रम केला आहे. रूडी कर्ट्झन यांना मागे टाकत दार हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने पंचगिरी केलेले व्यक्ती ठरले आहेत. आज पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या सामन्यात त्यांनी ही कामगिरी रचली. पंच म्हणून दार यांचा हा २१०वा एकदिवसीय सामना आहे. २०९एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच असण्याचा विक्रम कर्ट्झन यांच्या नावावर आहे.

त्यांच्यापाठोपाठ बिली बाऊडेन (२००), स्टीव्ह बकनर (१८१), सायमन टॉफेल आणि डार्ले हार्पर (१७४) आहेत. पाकिस्तानचे अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून एक दशकासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार्‍या दार यांनी पाकिस्तानच्या सामन्यात पंचगिरीला सुरुवात केली.

मागील वर्षी कसोटीत सर्वाधिक सामन्यांत पंच म्हणून विक्रम नोंदवण्याचा विक्रमही दार यांच्या नावावर केला. त्यांनी वेस्ट इंडीजच्या स्टीव्ह बकनर यांना मागे टाकले. दार यांनी १३२ कसोटी सामन्यांत पंचगिरी केली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तानचे एहसान रझा असून त्यांच्या नावावर ४६ टी-२० सामन्यात पंचगिरी करण्याचा विक्रम आहे.

या विक्रमानंतर दार म्हणाले, "कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केलेल्या यादीत माझा पहिला क्रमांक असणे हा माझा सन्मान आहे. मी असे म्हणू शकतो, की मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेतला आहे. "

ABOUT THE AUTHOR

...view details