मुंबई -यंदा झालेल्या सांगली आणि कोल्हापुरातील पुराच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या अपघातामुळे लोकांना शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांच्या मदतीसाठी अनेक जणांनी विविध प्रकारे मदत दिली आहे. भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे.
पूरग्रस्तांसाठी अजिंक्य रहाणे आला धावून, मदतीचे केले आवाहन
अजिंक्यने लोकांना पूरसंकटात सापडलेल्या लोकांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.
या मराठमोळ्या क्रिकेटपटूने ट्विटरवर एक मराठी पोस्ट शेअर केली आहे. अजिंक्यने पूरसंकटात सापडलेल्या लोकांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहना बरोबर, अजिंक्यने 'मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा' असे म्हटले आहे.
कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराची भयंकर स्थिती निर्माण झाली. या संकटात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.