महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अजिंक्य रहाणेच्या मुलीचं झालं बारसं, नाव आहे..... - रहाणेच्या मुलीचं बारसं न्यूज

आर्याचा जन्म झाला तेव्हा रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. हा सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठले आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली होती. क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंनी अजिंक्य आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या होत्या. मास्टर-ब्लास्टर सचिननेही रहाणेला गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले होते.

अजिंक्य रहाणेच्या मुलीचं झालं बारसं, नाव आहे.....

By

Published : Nov 8, 2019, 1:40 PM IST

मुंबई -भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या पत्नीने ५ ऑक्टोंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. आज एका महिन्यानंतर रहाणे दांपत्याने आपल्या कन्येचं बारसं केलं. अजिंक्यने आपल्या मुलीचा फोटो शेअर करताना त्याने 'आर्या अजिंक्य रहाणे' असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा -टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट'

आर्याचा जन्म झाला तेव्हा रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. हा सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठली आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली होती. क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंनी अजिंक्य आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या होत्या. मास्टर-ब्लास्टर सचिननेही रहाणेला गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले होते.

याआधी रहाणेने आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टवर सचिननेही रहाणेला एक सल्ला दिला. 'राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details