महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2020 : मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांचे खेळाडूंबरोबर सेलिब्रेशन - MI VS DC FINAL 2020 NEWS

मुंबई संघाने आयपीएल २०२०चे विजेतेपद पटकावल्यानंतर, मुंबई इंडियन्सची संघमालक नीता अंबानी या कर्णधार रोहित शर्मासमवेत आनंद साजरा करताना पाहायला मिळाल्या. या क्षणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

after winning ipl 2020 final mis honor nita ambani rohit sharma got high five
मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांचं खेळाडूंबरोबर सेलिब्रेशन

By

Published : Nov 11, 2020, 1:25 PM IST

दुबई - मुंबई इंडियन्सने मंगळवारी आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मुंबईचे आयपीएल कारकिर्दीतील हे ५ वे जेतेपद ठरले. या विजयानंतर मुंबई इंडियन्सची संघमालक नीता अंबानी या कर्णधार रोहित शर्मासमवेत आनंद साजरा करताना पाहायला मिळाल्या. या क्षणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईने दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी या मैदानात येऊन खेळाडूसमवेत आनंद साजरा करण्यात सामील झाल्या. नीता अंबानी या प्रथम कर्णधार रोहित शर्माकडे आल्या आणि विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्याला दोन्ही हाताने टाळी दिली. यानंतर त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

असा रंगला सामना -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित ६८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

हेही वाचा -IPL २०२० : नाद नाय करायचा..! मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद

हेही वाचा -IPLचे विजेतेपद पटकावल्यानंतर ठाकरे सरकारकडून मुंबई संघाचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details