राजकोट- कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने आणि स्पर्धा रद्द झाल्या असताना भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकटने या दहशतीतही आपला साखरपुडा उरकला. जयदेवने आपली मैत्रीण रिन्नी हिच्याशी साखरपुडा केला. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन रिन्नीसोबतचे फोटो ट्विट केले आहेत. भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराही या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होता.
जयदेव उनाडकटने नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्र संघाला आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिले. यानंतर त्याने आपली मैत्रीण रिन्नीसोबत साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चेतेश्वर पुजारानेही हजेरी लावली होती. पुजारानेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जयदेवचे अभिनंदन केले आहे.