आयर्लंडविरुद्धची कसोटी जिंकून अफगाणिस्तानने रचला 'इतिहास' - against
पल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात विजय मिळवणारा अफगाणिस्तान हा इंग्लंड आणि पाकिस्ताननंतरचा क्रिकेटविश्वातील तिसरा संघ आहे.
Afghanistan
देहरादून - आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा हा पहिलाच विजय असल्याने या विजयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
अफगाणिस्तानचा हा दुसराच कसोटी सामना होता. यापूर्वी अफगाणिस्तानने भारताविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात विजय मिळवणारा अफगाणिस्तान हा इंग्लंड आणि पाकिस्ताननंतरचा क्रिकेटविश्वातील तिसरा संघ आहे.
भारताला कसोटीतील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी २५ सामने खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलिया असा एकमेव संघ आहे ज्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. १९ मार्च १८७७ ला ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ४५ धावांनी मात केली होती.